शालेय विद्यार्थ्यांसाठी आयआयटी बॉम्बेचे उन्हाळी कार्यक्रम जाहीर
Indian Institute of Technology Bombay अंतर्गत कार्यरत Educational Outreach विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध समर प्रोग्राम्सची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, सर्जनशीलता, उद्योजकता आणि प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मे २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आयआयटी बॉम्बेच्या संशोधनाधारित आणि तंत्रज्ञान-केंद्रित शैक्षणिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळा, मेकरस्पेस, तंत्रज्ञान सुविधा आणि नवोन्मेषी प्रकल्पांचा परिचय करून दिला जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना Educational Outreach, IIT Bombay यांच्या वतीने प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात येणार आहे.

या अंतर्गत पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे :
- Makerspace Summer School – Batch 1 : २ ते १० जून २०२६
- Makerspace Summer School – Batch 2 : १२ ते २० जून २०२६
- NextGen@IITB – Interdisciplinary Summer School : २२ ते २६ जून २०२६
- Infinity Juniors – Entrepreneurship Bootcamp : १ ते ५ जुलै २०२६
- Design Thinking for Young Minds : जुलै २०२६ (तारीख लवकरच जाहीर होणार)
या कार्यक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, डिझाईन, उद्योजकता, शाश्वत विकास आणि आंतरशाखीय शिक्षण यांसारख्या भविष्योन्मुख क्षेत्रांवर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन तसेच प्रकल्पाधारित शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे.
Educational Outreach विभागाच्या मते, या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिज्ञासा आणि भविष्यातील शैक्षणिक व करिअरविषयक दिशा निश्चित करण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होईल.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी :
IIT Bombay School Outreach Programmes
कार्यक्रमासंदर्भातील चौकशीसाठी : schooloutreach@eo.iitb.ac.in
