मिल्लिया महाविद्यालयात जागतिक जल दिन साजरा

बीड : मिल्लिया कला विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी जागतिक जल दिनानिमित्त महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सय्यद हनीफ यांचे “शांततेसाठी पाणी” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पाणी व्यवस्थापन, पाणी नियोजन, पाणी बचत, पाण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ शफा खान यांनी केले, त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक जल दिनाचे महत्त्व सांगितले. जागतिक जल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ शेख रफीक यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com