सौ के एस के महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न

लोकसभा निवडणूक 2024 साठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक व प्रशिक्षण संपन्न

बीड : सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व निवडणूक साक्षरता मंडळ विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांच्या अध्यक्षते खाली लोकसभा निवडणूक 2024 साठी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम आणि मतदार जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता. भारतीय लोकशाही समोरील आव्हाने व बदलता मतदार वर्तणुक प्रवाह या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच मतदार जनजागृतीपर घोषवाक्य स्पर्धेचे  व पोस्टर प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये 19 एप्रिल 2024 रोजी निवडणूक विभागाच्या वतीने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट या मशीन आणि त्याच्या कार्यप्रणालीची माहिती देण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांकडून मतदान करून घेऊन मतदान प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयातील इलेक्शन डयुटी बजावणार्‍या कर्मचार्‍यांना निवडणूक मतदान प्रक्रिया तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन हाताळणे व त्यामधील बारकावे या बाबतची माहिती देण्यात आली. या साठी निवडणूक विभागाचे एरंडे साहेब, सगळे सर व पोलीस कर्मचारी अंकुशे यांची उपस्थिती होती.

Advertisement

त्यानंतर मतदार जनजागृती संदर्भात प्रा डॉ पांडूरंग सुतार यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यामध्ये त्यांनी मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे ते मतदाराने प्राथमिकतेने पार पाडले पाहिजे. लोकशाहीच्या सबलीकरणासाठी नागरीकांनी मतदार म्हणून निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर यांनी केले तर सूत्रसंचालन रासेयो चे कार्यक्रमाधिकारी डॉ पंडित खाकरे यांनी आणि आभार डॉ पल्लवी इरलापल्ले यांनी मानले. यावेळी पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ सतीश माऊलगे, उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा जालिंदर कोळेकर, प्रा डॉ सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक डॉ विश्वांभर देशमाने, डॉ अनिता शिंदे, डॉ खान अन्सार उल्ला शफीउल्ला, डॉ नागेश शेटे, प्रा गणेश कदम, प्रा पांडूरंग केदार, प्रा संजय काळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page