श्री राम लल्ला प्राण – प्रतिष्ठा दिनाची 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी सर्व संलग्नित महाविद्यालये व संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे श्री राम लल्ला प्राण – प्रतिष्ठा दिनाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुषंगाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने कार्यालयीन सूचना प्रकाशित केली असून दि. 22 जानेवारी, 2024 रोजी विद्यापीठाचे सर्व प्रशासकीय व शैक्षणिक विभागाचे कामकाज पूर्णत: बंद राहील.

Advertisement

तसेच विद्यापीठाशी सर्व संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था यांना सुद्धा सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तरी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आणि संलग्नित तसेच घटक महाविद्यालयांतील शिक्षक, अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी, असे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी विद्यापीठाच्यावतीने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page