शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील काही अभ्यासकमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मार्च एप्रिल, 2024 मधील उन्हाळी सत्रातील परीक्षा विविध परीक्षा केंद्रावर सुरू आहेत. शुकवार दि. 26 एप्रिल, 2024 व शनिवार दि. 27 एप्रिल, 2024 रोजी काही अभ्यासकमाच्या परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तथापि सदर दिवशी शिवाजी विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचा-यांना लोकसभा निवडणुक प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे.

Advertisement
Shivaji University, Kolhapur, suk

शुकवार दि. 26 एप्रिल, 2024 व शनिवार दि. 27 एप्रिल, 2024 रोजीच्या शिवाजी विद्यापीठ स्तरावरील होणा-या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षा ज्या त्या अभ्यासकमाच्या नियोजित शेवटच्या पेपर नंतर घेण्यात येणार आहेत.

तसेच पुढे ढकलण्यात आलेल्या शुक्रवार दि 26 एप्रिल, 2024 व शनिवार दि. 27 एप्रिल, 2024 रोजीच्या परीक्षेच्या तारखांचे सविस्तर वेळापत्रक यथावकाश विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page