पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ खो-खो (पुरुष) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती : स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या वतीने के. के. एम. महाविद्यालय, मनवट, परभणी येथे होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ खो-खो (पुरुष) स्पर्धेसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे. निवड झालेल्या खेळाडूंचा प्रशिक्षणवर्ग श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथे होणार आहे.

Advertisement
Sant Gadge Baba Amravati University will plant 500 trees in campus

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदराचा रोशन पिवल, पवन गुप्ता, रोहित चव्हाण व सर्वेश इंगळे, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा यश सदांशिव, अनुराग कुबडे, प्रतिक पाल व पियुष दहाट, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा गौरव दहिलेकर, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीचा अभिषेक पातालवंशी, शिवशक्ती महाविद्यालय, बाभुळगांवचा शुभम सुरोसे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा धनसिंग वड्डे, कै. एन. ए. डी. महाविद्यालय, चांदुरबाजारचा रितेश कु-हाडे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा मयुर भगत, जी.एस.टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारचा प्रथमेश साखरकर, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोलाचा अमिन रोढीवाले, श्री व्ही. एन. महाविद्यालय, मंगरुळपीरचा विकास मुठळ व डॉ. आर. जी. राठोड महाविद्यालय, मूर्तिजापूरचा दत्ता गावंडे यांचा समावेश आहे.

निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page