देवगिरीअभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 132 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड

इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या 132 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडल संचलित देवगिरी इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज मधील इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या परीसर मुलाखतीमध्ये 132 विद्याथ्यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना व्होडाफोन आयडिया लि कॅपजेमिनी अर्निंग स्क्रिप्ट प्रा लि पीएचएन टेक्नॉलॉजी प्रा लि मेटापॉइंटर लॅब्स, देवटाऊन, डोपार एनर्जी प्रा लि सेदेमॅक मेकॅट्रॉनिक्स प्रा लि टाटा ऑटोकॉम्प गोशन ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रा लि थेटावेगा टेक प्रा लि इ नांमाकित कंपनीमध्ये निवड झाली आहे.

Advertisement

ही मुलाखत  घेण्यासाठी कंपनीचे एच आर आणि अॅडमीन विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थीत होते. या परीसर मुलाखतीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, टेकनिकल रांऊड, ग्रुप डिस्कशन आणि एच आर रांऊड अशातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. परीसर मुलाखत घेण्यासाठी कंपनीचे एच आर ॲण्ड ॲडमीन विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थीत होते.

निवड झालेल्या विद्यार्थाचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ प्रकाशदादा सोळुंके, सचिव आ सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने, विभागप्रमुख डॉ राजेश औटी, डॉ सत्यवान धोंडगे, प्रा संजय कल्याणकर, डॉ गजेंद्र गंधे, डॉ सचिन बोरसे, डॉ शोएब शेख, डॉ रुपेश रेब्बा, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा अमरसिंह माळी व प्रा महेश बडमेरा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page