गोंडवाना विद्यापीठात ‘युगप्रवर्तक- डॉ हेडगेवार’ नाटिकेचे सादरीकरण ३० जूनला

गडचिरोली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जून २०२५ रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील नवीन सभागृहात सायंकाळी ६ वाजता नादब्रम्ह निर्मित व युगसंधान प्रस्तुत ‘युगप्रवर्तक – डॉ हेडगेवार’ या द्विअंकी नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.

‘युगप्रवर्तक – डॉ हेडगेवार’ हे नाटक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांचे जीवन व संघर्ष दाखविणारे हिंदी भाषेतील प्रभावशाली नाटक आहे. या नाटकाचा उद्घाटन समारंभ गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षेतेखाली होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रचिंतजी अरविंदजी पोरेड्डीवार, घिसुलालजी काबरा आणि गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे ह्यांची उपस्थिती लाभणार आहे. ‘युगप्रवर्तक – डॉ हेडगेवार’ या नाटकाचे लेखन पद्माकर धानोरकर यांनी केले असून नेपथ्य व दिग्दर्शन सुबोध सुरजीकर यांचे आहे. नाटकाला संगीत शैलेश दाणी यांनी दिले असून ३० ते ३५ कलाकारांचा समावेश या नाटकामध्ये आहे.

‘युगप्रवर्तक – डॉ हेडगेवार’ या नाटकाचे अनेक प्रयोग भारतातील विविध ठिकाणी यशस्वीरीत्या झाले असून सध्या हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. गडचिरोली शहरातील नाट्यरसिक व नागरिकांना यानिमित्ताने एक चांगली पर्वणी मिळाली असून तिचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अनिल हिरेखण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com