नुतन फार्मसीच्या विद्यार्थ्याला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक पुरस्कार प्राप्त

कवठेमहांकाळ : सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या संस्था मध्ये व्यंकटेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आळंदी पुणे यांचेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. सन २०२४ साली नुतन कॉलेज ऑफ फार्मसी कवठेमहांकाळ मधील अंतिम वर्ष फार्मसी मधील विद्यार्थी प्रथमेश तानाजी मिसाळ याला व्यंकटेश बहुउद्देशीय संस्थे कडून राज्यस्तरीय आदर्श सामाजिक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Advertisement

हे यश संपादन करण्यात संस्थेच्या अध्यक्षा डॉ नुतन माळी व सचिव डॉ रामलिंग माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमोल पाटील, प्राचार्य डॉ राजेश जगताप यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page