मुक्त विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन आणि व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ जयदिप निकम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्याचप्रमाणे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, कुलसचिव दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे, संचालक डॉ प्रकाश देशमुख, ग्रंथालय प्रमुख डॉ मधुकर शेवाळे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे, उपकुलसचिव डॉ चंद्रकात पवार, विजयकुमार पाईकराव, सुनिल निकम, आदी मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Advertisement

याप्रसंगी कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन आणि डॉ जयदिप निकम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग अशा कार्याबद्दल उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष साबळे यांनी केले, तर आभार कुलसचिव दिलीप भरड यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page