‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉ `बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Advertisement

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, नवोपक्रम नवसंशोधन व सहचर्य विभागाचे संचालक डॉ शैलेश वाढेर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, उपकुलसचिव डॉ रवि सरोदे, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम, सहा उपकुलसचिव डॉ सरिता यन्नावार, रामदास पेदेवाड, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, रामचंद्र शम्बोले, उद्धव हंबर्डे, नारायण गोरे, जालिंधर गायकवाड, बंडू कांबळे, प्रमोद हंबर्डे, संदिप लुटे, उद्धव सातपुते, रामदास खोकले, तुकाराम हंबर्डे, शिवाजी हंबर्डे, गोपिराज हंबर्डे, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page