राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University येथे सिमेंट उद्योगातील अग्रगण्य UltraTech Cement कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह उत्साहात पार पडला. विद्यापीठाच्या पदव्युत्तर भूगर्भशास्त्र विभागात शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.
कुलगुरू Dr. Manali Kshirsagar यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाला अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीचे उपाध्यक्ष Namit Mishra, उपाध्यक्ष Kapil Kher, व्यवस्थापक Puran Kalam Singh Rawat, सहाय्यक व्यवस्थापक Soumya Shukla, भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख Dr. Sumedh Humne, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी Dr. Bhushan Mahajan तसेच Dr. Hemant Khandare उपस्थित होते.

या प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे एम.एस्सी. भूगर्भशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना अभियंता पदासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात एकूण ३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. विविध चाचण्या आणि मुलाखतीनंतर कंपनीत ५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. कपिल खेर यांनी आपण या विभागाचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधींबाबत माहिती दिली. तसेच भविष्यातही अशा प्रकारचे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
विभाग प्रमुख डॉ. सुमेध हुमणे यांनी प्लेसमेंट ड्राईव्हच्या आयोजनाबाबत माहिती दिली. विभागाच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
#UltraTechCement #RTMNU #NagpurUniversity #PlacementDrive #GeologyDepartment #CampusPlacement #NagpurNews #EducationNews #Maharashtra #CareerOpportunity