राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 113 वा दीक्षांत समारंभ 9 जानेवारी रोजी

नागपूर | CampusKatta News | 7 जानेवारी 2026

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा एकशे तेरावा (113 वा) दीक्षांत समारंभ शुक्रवार, 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता ऑडिटोरियम हॉल, नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, राजनगर, नागपूर येथे संपन्न होणार आहे.

या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरू मा. डॉ. मनाली क्षीरसागर विराजमान राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूरचे अध्यक्ष मा. डॉ. अनंत पांढरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तसेच सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित राहणार आहेत.


61,871 विद्यार्थ्यांना पदवी / पदविका प्रदान

विद्यापीठाच्या हिवाळी 2024 व उन्हाळी 2025 सत्रातील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या दीक्षांत समारंभात पदवी व पदविका प्रदान करण्यात येणार आहे.

  • एकूण पदवी/पदविका धारक: 61,871
  • स्नातक पदवीधर: 49,230
  • स्नातकोत्तर पदवीधर: 12,087
  • डि.लीट.: 2 विद्यार्थी

विद्याशाखानिहाय पदवी प्रमाणपत्रे

  • विज्ञान व तंत्रज्ञान: 20,308
  • वाणिज्य व व्यवस्थापन: 14,625
  • मानव विज्ञान: 12,441
  • आंतरविद्याशाखीय अभ्यास: 5,709
  • स्वायत्त महाविद्यालये: 8,514
  • पदविका प्रमाणपत्र: 273
  • एम.आर्च. बाय रिसर्च: 1

229 पदके व पारितोषिकांचे वितरण

या दीक्षांत समारंभात 140 गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण
194 सुवर्ण, 8 रजत व 27 रोख पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.

उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी

  • क्रतिका शंकर धोटे (BA LLB – 5 वर्षे): 5 सुवर्ण पदके + 2 पारितोषिके
  • सुचेतन प्रकाश गमने (MBA): 6 सुवर्ण पदके
  • अर्चना किसन लाळे (MA बुद्धिस्ट स्टडीज): 6 सुवर्ण पदके
  • तथागत ठाकूर (LLB – 3 वर्षे): 5 सुवर्ण पदके
  • निवेदिता राजेंद्र फुसाटे (MA मराठी): 4 सुवर्ण पदके + 1 पारितोषिक
  • प्राची वामनराव ठाकरे (Bachelor of Journalism): 3 सुवर्ण पदके + 2 पारितोषिके

279 संशोधकांना आचार्य (PhD) पदवी

या दीक्षांत समारंभात 279 संशोधकांना आचार्य (PhD) पदवी प्रदान केली जाणार आहे.

  • विज्ञान व तंत्रज्ञान: 121
  • वाणिज्य व व्यवस्थापन: 58
  • मानव विज्ञान: 81
  • आंतरविद्याशाखीय अभ्यास: 19

लाईव्ह प्रक्षेपणाची सुविधा

113 वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर दुपारी 3 वाजल्यापासून थेट (Live) प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे जगभरातील विद्यार्थी व पालकांना हा सोहळा पाहता येणार आहे.


विद्यार्थ्यांसाठी सूचना

  • पदके/पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे
  • दीक्षांत समारंभाचे प्रवेशपत्र 8 जानेवारी रोजी परीक्षा विभागातून प्राप्त करावयाचे आहे

पत्रकार परिषदेस कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी श्री. हरीश पालीवाल, परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रभारी संचालक श्री. मनीष झोडपे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com