सौ के एस के महाविद्यालयात लोकनेत्या माजी खासदार स्व केशरबाई क्षीरसागर ऊर्फ काकू यांची पुण्यतिथी साजरी

बीड : सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बीडच्या लोकनेत्या माजी खासदार स्व केशरबाई क्षीरसागर ऊर्फ काकू यांची 18 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी नवगण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले. या प्रसंगी लोकनेत्या माजी खासदार स्व केशरबाई क्षीरसागर ऊर्फ काकू यांच्या जीवन आणि कार्याचा परिचय करून दिला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विश्वांभर देशमाने, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ ए एस खान, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ पांडूरंग सुतार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com