गोंडवाना विद्यापीठातील ‘इग्नू’ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास मुदतवाढ

10 सप्टेंबरपर्यंत घेता येणार प्रवेश

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) अभ्यास केंद्रातंर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची अंतिम तारीख दि 31 ऑगस्ट 2024 होती. आता मात्र, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास मुदतवाढ देण्यात आली असून 10 सप्टेंबर 2024 प्रवेश घेण्याची अंतिम तारीख असणार आहे.

Gondwana University GUG Gadchiroli

प्रवेशोच्छूक विद्यार्थ्यांनी सदर अभ्यासक्रमाकरीता इग्नूच्या वेबसाईटवरुन तसेच लिंकवरुन अर्ज सादर करता येईल. अभ्यासक्रमाबाबत माहिती तसेच ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती इग्नूच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

तरी, प्रवेश घेण्यास इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात 10 सप्टेंबर पर्यंत सादर करावे. प्रवेशासंबधी अधिक माहितीकरीता गोंडवाना विद्यापीठातील “इग्नू” अभ्यासकेंद्राशी सकाळी 10:00 ते 12:00 या वेळेत प्रत्यक्ष अथवा 8275399300 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन इग्नू अभ्यास केंद्रांच्या समन्वयक डॉ प्रीती पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com