अमरावती विद्यापीठात भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंती उत्साहात साजरी

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार महानुभाव अध्यासन केंद्राच्यावतीने डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्रात भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे व विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ व्ही एम मेटकर यांनी पुष्प अर्पण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com