विवेकानंद महाविद्यालयात ‘पांडुरंग नामी’ भक्तीगीत गायन कार्यक्रम संपन्न

छत्रपती संभाजीनगर : विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संगीत विभागाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त ‘पांडुरंग नामी’ या भक्ती विषयक गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी आर शेगुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी संगीत विभागातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स मधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी भक्तीपर गाण्यांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीत विभागातील आनंद पाटील, गणेश दळे, अश्विनी भंडारे, गिरीजीनाथ जाधव, मिलिंद डोलारे, गौरव ढोले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा योगेश कातबने यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ टी आर पाटील, डॉ अरुणा पाटील, प्रदीप पाटील तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com