लोक शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रा सुरेश चौथाईवाले यांचे व्याख्यान

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त, येत्या गुरुवारी (१ ऑगस्ट ) व्याख्यानाचे, आयोजन करण्यात आले आहे. शाहिर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वतीने सकाळी ११:३० वाजता हा कार्यक्रम, विद्यापीठाच्या कला सादरीकरण विभाग (नाट्यशास्त्र) या ठिकाणी संपन्न होईल.

Advertisement
Dr Babasaheb Ambedkar Marathwada University BAMU

या वेळी प्रसिद्ध साहित्यिक, प्रा सुरेश चौथाईवाले यांचे “अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील सामाजिक जाणिवा” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केल्या गेले आहे.

या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यासनाचे संचालक डॉ वैशाली बोदेले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page