अमरावती विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले.

Advertisement

जयंती कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ संजय डुडुल, ननसा संचालक डॉ अजय लाड, तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page