‘स्वारातीम’ विद्यापीठात डॉ शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये दि १४ जुलै रोजी डॉ शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयिका डॉ योगिनी सातारकर यांनी डॉ शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Advertisement

यावेळी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके, प्रा डॉ राजाराम माने, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, उपमहापौर सतिश देशमुख, अवधुत क्षीरसागर, अविनाश रावळकर, नारायण गोरे, रामदास खोकले, बबन हिंगे, अंगद इंगोले व विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांनी डॉ शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *