गोंडवाना विद्यापीठात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि १० जुलै २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement
Gondwana University GUG Gadchiroli

सदर रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या तसेच विविध महामंडळे उपस्थित असणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी स्वत:चा बायोडाटा, आधारकार्ड तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रासह गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहून पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page