अमरावती विद्यापीठातील संशोधन मान्यता समितीवर तज्ज्ञांची निवड करण्याकरीता नावे पाठविण्याचे आवाहन


अमरावती : सर्व संबंधितांच्या माहितीकरीता सूचित करण्यात येते की, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संशोधन मान्यता समिती (आर आर सी) वर कुलगुरूंच्या नामनिर्देशनाने तज्ज्ञांची निवड करावयाची आहे.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

परिनियम १/२०२४ मधील परिच्छेद ७ मध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक असलेल्या दस्तऐवजासह आपले अर्ज परिचय पत्रासह व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील कलम ६४ नुसार आपले वचनपत्रासह दि ३० जुलै, २०२४ रोजी सायंकाळी ०५:०० वा पर्यंत (सुटीचा दिवस वगळून) केंद्रीय आवक शाखा, सामान्य प्रशासन विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडे सादर करावयाचे आहे.

Advertisement

कृपया संबंधितांनी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आचार्य कक्षाचे उपकुलसचिव डॉ दादाराव चव्हाण यांच्याशी प्रत्यक्ष अथवा मो क्र ९४२२७२४८९५ यावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page