उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची प्री पीएच डी कोर्स वर्क परीक्षा संपन्न

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बुधवार दि ३ जुलै रोजी प्री पीएच डी कोर्स वर्क परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. पीएच डी प्रवेश पुर्व परीक्षा (पेट) २०२३ मध्ये घेण्यात आली. या परीक्षेतील विद्यार्थ्यांची प्री पीएच डी कोर्स वर्क परीक्षा बुधवारी झाली.

North Maharashtra University Pre Ph D Course Work Exam Completed

या परीक्षेसाठी ७६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा केंद्रात चार बॅचेसमध्ये ही परीक्षा झाली. कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र – कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा योगेश पाटील यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली. केंद्रप्रमुख प्रा पी पी माहुलीकर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com