मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षणक्रमास प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेमार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व प्रमाणपत्र आणि पदविका शिक्षणक्रमांची प्रवेश अर्ज भरण्याची अंतीम मुदत 19 जून 2014 पर्यंत होती.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी सदर प्रवेश प्रक्रियेपासून विद्यार्थी वंचीत राहू नये, या उद्देशाने कृषी शिक्षणक्रम प्रवेशाची मुदत दिनांक 23 जून 2024 पर्यंत वाढविण्यास मान्यता दिली असून. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी केले आहे.