महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी कुलगुरू प्रा संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणादायी कार्याबद्दल उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुलसचिव दिलीप भरड यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com