”बामु” विद्यापीठाच्या डॉ साधना पांडे यांचा शनिवारी सेवा गौरव

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विधि विभागप्रमुख डॉ साधना पांडुरंगप्रसाद पांडे या तीस वर्षांच्या सेवेनंतर येत्या ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. या निमित्त कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सेवा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement
डॉ साधना पांडे

डॉ पांडे या गेल्या तीन दशकांपासून अध्यापन, संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. या काळात त्यांनी विधि विभागात प्राध्यापक, विभागप्रमुख, अधिष्ठाता, कुलसचिव, संचालक- आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र, अधिसभा , विद्या परिषद व व्यवस्थापन परिषद सदस्य, विधी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य आदी पदांवर कार्य केले आहे. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते येत्या शनिवारी (दि १) दुपारी ०४:०० वाजता त्यांचा सेवागौरव सोहळा महात्मा फुले सभागृहात होणार आहे. विधी विभागाच्या वतीनेही त्यांना निरोप देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page