अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी – 2024 काही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी-2024 बी आर्च सेमि-8 (सीजीएस), बी ए सेमि – 1 (सीबीसीएस), एम ए (जर्नालिझम अॅन्ड मास कम्युनिकेशन) सेमि – 4 (सीबीसीएस) (रिवाईज्ड), बी एस्सी सेमि – 1 (सीबीसीएस) एम पी एड्से मि – 4 (नवीन), बी पी एड् अॅन्ड एम पी एड् सेमि – 1 व 2 (नवीन), पी जी, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अॅन्ड योगिक सायन्स सेमि – 2 (एनईपी), बी ई सेमि – 1 व 2 आणि बी टेक सेमि -1 (इंजि सीजीएस), बी ई सेमि – 4 (आय टी अॅन्ड एक्स्टेंशन) (सीजीएस) आणि एम एस्सी (अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स) (सीबीसीएस -नवीन) एस-4 या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून दुरुस्ती/सुधारित/नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

यासंदर्भात सर्व संबंधित महाविद्यालयांना परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी तातडीने आपल्या विद्यार्थ्यांना कळवायचे आहे. तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी 9763833969 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com