शिवाजी विद्यापीठाच्या 2024-2025 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रथम वर्ष प्रवेश अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

कोल्हापूर : सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ अधिविभाग व संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिकविल्या जाणा-या  M Sc व तत्सम अभ्यासक्रम तसेच विद्यापीठ अधिविभागांकडील एम ए एम कॉम एम ए (म्युझिक)ए एम ए वुमेन्स स्टडीज, एलएल एम मास्टर ऑफ रूरल स्टडीज, एम लिब अँड इनफॉर्मेंशन सायन्स, एम एस्सी (Mathematics with Computer Application), एम सी ए (संगणकशास्त्र) एम बी ए (डिस्टन्स मोड), बीसीए, बी ए स्पोर्टस, बी ए (फिल्म मेकिंग), बी कॉम (बँकिंग ॲड फायनान्स), बी एस्सी – एम एस्सी नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी (एकात्मिक पाच वर्षे) बी एस्सी – एम एस्सी अर्थशास्त्र (एकात्मिक पाच वर्षे) या अभ्यासक्रमांच्या भाग 1 प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षेसाठी यापूर्वी दि 25/04/2024 पर्यंत तसेच प्रवेश परिक्षेव्यतिरिक्त अभ्यासक्रमांसाठी दि 14/05/2024 अखेर अर्ज मागणी करण्यात आले होते.

Advertisement
Shivaji University, Kolhapur, suk

यास विद्यार्थी हितास्तव ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा आहे अशा अभ्यासक्रमांच्या भाग 1 प्रवेशाकरिता दि 10/05/2024 पर्यंत व ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा नाही अशा अभ्यासक्रमांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी दि 25/05/2024 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा असलेल्या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा दि 16/05/2024 ते 19/05/2024 रोजी घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेचे ओळखपत्र (हॉल तिकीट) दि 15/05/2024 अखेर विद्यार्थ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठात नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या सीमा भागातील विद्यार्थ्यांकरीता विशेष सवलत देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी  सविस्तर तपशीलासाठी https://www.unishivaji.ac.in/mscadmission/For-Student-Information या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच प्रवेशासंदर्भात अद्ययावत माहिती वेळोवेळी वरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page