सौ के एस के महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्साहात साजरी

बीड : सौ के एस के महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुषपहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, योगदाना बरोबर मागासवर्गीय च्या उद्धारासाठी केलेल्या कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला.

प्रास्ताविक व आभार डॉ चौधरी व्ही एम यांने केले. यावेळी उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळणकर, पदयुत्तर प्रमुख डॉ सतिश माऊलगे, उपप्राचार्य डॉ नारायण काकडे पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, चंद्रकांत पवारसह शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com