डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रा सुरेश पुरी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सामाजिक कार्य महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटना यांच्याद्वारे आयोजित ‘स्मृतीसंगम २०२४’ या कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालयाचे संस्थापक प्रा सुरेश पुरी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्र-कुलगुरू वाल्मीक सरवदे यांच्या हस्ते प्रा पुरी यांना रविवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विद्यापीठाच्या विधी विभागातील सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर डॉ. पी. एम. शहापूरकर,प्रा. रमेश गावित. माजी प्राचार्य धनंजय कांबळे, प्रा. राम बाहेती, प्रा. नीलिमा पांडे, प्रा. युसुफ बेन्नुर, प्रा. हेमलता कुलकर्णी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश मते, सचिव अमोल भिलंगे, उपाध्यक्ष शेख खय्युम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com