शिवाजी विद्यापीठात सर सी व्ही रमन आयडिएशन क्लबच्या वतीने डॉ पारळे यांचे व्याख्यान

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील नॅनोसायन्स अधिविभागामधील सर सी. व्ही. रमन आयडिएशन क्लबच्या वतीने कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील आणि कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनातून, मंगळवार, दि. १३ फेबुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता, शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे, ‘दक्षिण कोरियामधील उच्च शिक्षणाच्या संधी’ या विषयावर डॉ. विनायक पारळे यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे.

या व्याख्यानाचा लाभ सर्व विदयार्थी, संशोधक तसेच प्राध्यापकांनी घ्यावा असे आवाहन, नॅनोसायन्स अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. के. के. शर्मा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com