गोंडवाना विद्यापीठाच्या लोकपाल पदी न्यायाधीश अविनाश राजकारणे यांची नियुक्ती

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या लोकपाल पदी नागपूर येथील सेवानिवृत्त अतिरिक्त सत्र न्यायाधीश अविनाश मधुकर राजकारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेनुसार लोकपाल पदावर दिनांक ६ फेब्रुवारी २०२४पासून अंशकालीन तत्वावर , तीन वर्षाकरीता किंवा त्यांच्या वयाच्या ७० वर्ष पूर्ण होईल तोपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल अविनाश मधुकर राजकारणे यांचे सार्वत्रिक अभिनंदन होत आहे.

Gondwana University GUG Gadchiroli

विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर तातडीने निर्णय होणार, विद्यापीठाशी संलग्नित चंद्रपुर, गडचिरोली या दोन्ही जिल्हांतील महाविद्यालये व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या किंवा विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या निर्णयाविरुद्धच्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता व निर्णय देण्याकरीता गोंडवाना विद्यापीठाच्या लोकपाल पदी अविनाश मधुकर राजकारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com