महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरु

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र – 2023 एम. बी. बी. एस. पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षेस दि. 08 फेब्रुवारी 2024 पासून प्रारंभ होत आहे.

muhs-logo

हिवाळी सत्र – 2023 मधील लेखी परीक्षा राज्यातील एकूण 36 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी सुमारे 1,910 पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. यानुसार सदर परीक्षा 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत घेण्यात येणार आहेत. परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिध्द करण्यात आली असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com