उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरूष) स्पर्धेचे आयोजन

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने दि. १८ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरूष) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून तीन राज्यातील ६२ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

KBCNMU-GATE

महाराष्ट्र, गुजरात व गोवा या तीन राज्यातील ६२ क्रिकेट संघ सहभागी होतील. विद्यापीठ, मुळजी जेठा महाविद्यालयाचे मैदान, सावखेडा शिवारातील महेंद्र कोठारी स्पोर्टस् अकादमीचे मैदान आणि अनुभुती शाळेचे मैदान अशा चार मैदानांवर या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांच्या नियोजनासाठी विविध २२ समित्या कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी गठीत केल्या असून कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली व त्यामध्ये स्पर्धेच्या आयोजनावर सविस्तर चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com