उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सेवेतुन निवृत्त झाल्याबद्दल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांच्या सेवेचा गौरव

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सेवेतुन वाल्मिक शिरसाठ व जगन्नाथ चौधरी हे दोन कर्मचारी दि. ३१ जानेवारी रोजी निवृत्त झाल्याबद्दल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला.

On retiring from the service of KBCNMU, Vice-Chancellor Prof. V. L. Maheshwari Glory to his service at the hands

वाल्मिक शिरसाठ हे विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रात सहायक म्हणून तर जगन्नाथ चौधरी हे वित्त विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते. कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांच्या हस्ते या दोघांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचारी संघटना, मागासवर्गीय कर्मचारी संघटना व पतपेढीच्यावतीने देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य ॲङ अमोल पाटील, नितीन झाल्टे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com