मिल्लिया महाविद्यालयात “मराठीत बोल” कार्यक्रम

दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा – प्रोफेसर मिर्झा असद बेग
बीड :
मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांसाठी “मराठीत बोल” या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक प्रोफेसर मिर्झा असद बेग, कार्यक्रमाचे संयोजक नॅक समन्वयक डॉ. अब्दुल अनीस यांची उपस्थिती होती.

Advertisement
"Marathit Bol" Program at Millia College

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अब्दुल अनीस यांनी केले. त्यांनी ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी नसून, हिंदी किंवा उर्दू आहे अशा विद्यार्थ्यांनी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करावा म्हणून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे असे सांगितले. प्रमुख मार्गदर्शक प्रोफेसर मिर्झा असद बेग यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा तसेच वर्ग मित्रांना बोलताना व कार्यालयीन कामासाठी सुद्धा मराठी भाषेचा वापर करावा. प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर होत आहे. भाषा व्यक्तीमध्ये योग्य संस्कार निर्माण करते.


केवळ आपल्या बोलण्यातून नव्हे तर आचार-विचारातून मराठी भाषा दिसायला हवी व तिचे संवर्धन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे असे सांगितले. बी. एस्सी प्रथम वर्षाचा विद्यार्थी यासेर खान शाहेद खान व विद्यार्थिनी शेख आलिया शिरीन यांनी “मराठी बोल” याबद्दल आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अब्दुल अनीस यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page