महाराष्ट्र राज्य हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी संस्था येथे “द ग्रेट इंडियन कार्निव्हल” आयोजन

भारतीय स्ट्रीट फूडचा उत्सव –भारतीय खाद्य महोत्सवाची उत्साहात सांगता

पुणे: महाराष्ट्र राज्य हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी संस्था (डिग्री), पुणे येथे “द ग्रेट इंडियन कार्निव्हल – भारतीय खाद्यपरंपरेचा गौरव” या भव्य खाद्य महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या खुल्या प्रांगणात उत्साहात पार पडले. अंतिम वर्षाच्या बीएचएमसीटी (बॅच २०२२) विद्यार्थ्यांनी संकल्पना मांडून पूर्णतः विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली साकारलेला हा महोत्सव उपस्थितांमध्ये विशेष आकर्षण ठरला. भारतीय गल्ल्यांतील विविध चवी, सुगंध आणि खाद्यसंस्कृतीमुळे परिसर उत्सवमय झाला असून सुमारे २०० हून अधिक पाहुण्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमाला मा. डॉ. विनोद मोहितकर (संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष, MSIHMCT) आणि डॉ. डी. व्ही. जाधव (सहसंचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय, पुणे) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच माजी विद्यार्थी, पालक आणि संस्थेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे कार्यक्रमाला अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाली.

महाराष्ट्र राज्य हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी संस्था येथे “द ग्रेट इंडियन कार्निव्हल” आयोजन The "Great Indian Carnival" is being organized at the Maharashtra State Institute of Hotel Management and Catering Technology.
महाराष्ट्र राज्य हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी संस्था येथे “द ग्रेट इंडियन कार्निव्हल” आयोजन The “Great Indian Carnival” is being organized at the Maharashtra State Institute of Hotel Management and Catering Technology.

पारंपरिक फाइन-डायनिंगच्या चौकटीबाहेर जाऊन भारतीय स्ट्रीट फूडच्या मूळ गाभ्यावर आधारित संकल्पना या महोत्सवात सादर करण्यात आली. पाहुण्यांनी कच्छी दाबेली, खीमा पाव, छोले कुलचे, लिट्टी चोखा, डाल पकवान, बटर चिकन यांसारख्या लोकप्रिय पदार्थांचा आस्वाद घेतला. तसेच सोया चाप टिक्का, रोस्टेड फ्लॉवर रॅप्स, काकोरी कबाब, अमृतसरी फिश टिक्का आणि पारंपरिक सीख कबाब यांनी खाद्य अनुभव अधिक समृद्ध केला.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे एग विभाग, जिथे विविध अंड्यांचे पदार्थ प्रत्यक्ष तव्यावर ताजेतवाने तयार करून पाहुण्यांसमोर सादर करण्यात आले. कुल्हड शैलीतील पेय आणि सूप सादरीकरणामुळे उपस्थितांना पारंपरिक भारतीय स्ट्रीट फूड संस्कृतीची झलक अनुभवता आली. पायनॅपल पिकांते आणि शिकंजी यांसारख्या भारतीय शैलीतील मॉकटेल्सनी पेय विभागाला वेगळी ओळख मिळवून दिली.

महाराष्ट्र राज्य हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी संस्था येथे “द ग्रेट इंडियन कार्निव्हल” आयोजन The "Great Indian Carnival" is being organized at the Maharashtra State Institute of Hotel Management and Catering Technology.

प्राचार्या डॉ. सीमा झगडे म्हणाल्या, “The Great Indian Carnival हा केवळ खाद्य महोत्सव नसून भारतीय खाद्यपरंपरेतील विविधतेचा, विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचा आणि अनुभवाधारित शिक्षणाचा उत्कृष्ट नमुना आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना व्यावहारिक शिक्षणाची नवी दिशा मिळाली आहे.”

प्राचार्या डॉ. सीमा झगडे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा महोत्सव यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सचिन रायरीकर यांनी प्रभावी समन्वय साधला, तर प्रा. संपदा परांजपे, प्रा. देवेश जानवेकर, डॉ. विद्या कदम आणि चेतन गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

या खाद्य महोत्सवाने पाहुण्यांच्या मनात स्वाद आणि आनंदाची अविस्मरणीय आठवण निर्माण करत MSIHMCT च्या समाजाभिमुख आणि व्यावसायिक शिक्षण पद्धतीची उत्कृष्ट झलक सादर केली.

महाराष्ट्र राज्य हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी संस्था येथे “द ग्रेट इंडियन कार्निव्हल” आयोजन The "Great Indian Carnival" is being organized at the Maharashtra State Institute of Hotel Management and Catering Technology.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com