छत्रपती शाहू महाराज महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शाहू महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एन-११ हडको या महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. पल्लवी साबळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव राहूल म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

Republic day celebration in Chhatrapati Shahu Maharaj College

यावेळी राहूल म्हस्के सर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक सुभेच्छा दिल्या. विद्यार्थीनी सांची म्हस्के व गायत्री शिंदे प्रजासत्ताक दिनानिमित्त काव्य वाचन केले. तसेच मतदानाचा अधिकार जनजागृती, तंबाखू मुक्त पोस्टर प्रदर्शन व शपथ घेतली. या कार्यक्रामचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. अश्विनी सोनुने यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. जाधव मनोज यांनी केले. प्रा. स्वप्नील शेळके, प्रा. प्रियंका जाधव, ऋषिंदर मानकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com