राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन परेडमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे रासेयो स्वयंसेवक सहभागी

अमरावती | 13 जानेवारी 2026 | Campuskatta News

मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर 26 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन परेडमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) चे आठ स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रासेयो कक्षाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन परेड निवड चाचणीतून या स्वयंसेवकांची निवड करण्यात आली.

NSS volunteers from Sant Gadge Baba Amravati University participated in the state-level Republic Day parade.
NSS volunteers from Sant Gadge Baba Amravati University participated in the state-level Republic Day parade.

निवड झालेले रासेयो स्वयंसेवक :

  • गितेश आगरकर – महात्मा फुले कला, वाणिज्य व सितारामजी विज्ञान महाविद्यालय, वरूड
  • ओम वाकुडकर – जी.एस. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव
  • कृष्णा मोरे – जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा
  • सचिन साबळे – श्री. आर.एल.टी. विज्ञान महाविद्यालय, अकोला
  • कु. मैथिली सरोदे – बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ
  • कु. सलोनी भट्ट – प्रो. राम मेघे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय, बडनेरा
  • कु. राजेश्वरी आसोले – पंकज लध्दड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीज, बुलडाणा
  • कु. हेमलता पवार – श्रीमती एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला

राज्यस्तरीय परेड संघात स्थान मिळाल्याबद्दल या सर्व स्वयंसेवकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांनी स्वयंसेवकांचे अभिनंदन करत त्यांच्या यशाचे कौतुक केले. तसेच प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे आणि रासेयो संचालक डॉ. निलेश कडू यांनीही निवड झालेल्या स्वयंसेवकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com