सद्गुरु जनेश्वर माध्यमिक विद्यालयच्या सईद हकीम शेखचा तालुका स्तरीय कुस्तीत प्रथम क्रमांक
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर : सद्गुरु जनेश्वर माध्यमिक विद्यालय, घोडेगाव (ता. खुलताबाद) येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी सईद हकीम शेख याने तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कुस्ती प्रकारात १७ वर्ष वयोगट व ४८ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सईदच्या या विजयामुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व शिक्षकवृंदाने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे सईदची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव म्हणाले, “सईदने दाखवलेली चिकाटी, मेहनत आणि क्रीडाभावना ही इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचे हे यश संपूर्ण शाळेसाठी अभिमानास्पद आहे.”

या यशामध्ये मार्गदर्शक संजय गोमलाडू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून मुख्याध्यापक अधिकर खैरनार यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सईदचे कौतुक केले. शाळेच्या सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी त्याला पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
