डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन व श्रमदान
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना पद्वयुत्तर विभागाच्या वतीने आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन व श्रमदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना पद्वयुत्तर विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ निर्मला जाधव यांनी लेखक, साहित्यिक तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णाभाऊंच्या कार्यांचा आढावा घेत पारंपरिक अर्थाने शिक्षण अथवा लेखन, साहित्याचा कोणताही वारसा उपलब्ध नसताना त्यांनी निर्मिलेले साहित्य आपल्याला अंतर्मुख करते व समाज समजून घेण्याची दृष्टी प्रदान करते असे प्रतिपादन केले.



तसेच अण्णाभाऊ यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील सहभाग व अण्णाभाऊ यांचे आयुष्य हे आजही संघर्षाचे प्रतिमान म्हणून आपल्याला प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन डॉ जाधव यांनी केले. याप्रसंगी ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातील प्रा अश्विनी मोरे यांनी देखील अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा शुभेच्छा देत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य आणि संघर्षशील आयुष्याचा आढावा घेतला.
याप्रसंसगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान देखील केले .यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन देवडे व आभार ऋषिकेश चांदने यांनी केले.
