महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर : दर वर्षा प्रमाणे दिनांक 21 जून 2025 रोजी मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या परिपत्रकानुसार समग्र कल्याण आणि शाश्वत जीवनासाठी योगाच्या अभ्यासाबद्दल जागरूकता पसरविण्याकरिता महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील सेमिनार हॉलमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ बिंदू एस रोनाल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यापीठाचे कुलसचिव प्रा डॉ धनाजी जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

तसेच विद्यापीठाचे योग प्रशिक्षक डॉ आनंद हातोळे व योग प्रशिक्षिका डॉ नम्रता सावजी यांच्या योग प्रशिक्षणाखाली व मार्ग दर्शनानुसार “आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमांमध्ये विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ निवृत्ती गजभारे, कुलगुरू यांचे विशेष कार्यकारी अधिकारी शहापुरे, लेखा व वित्त अधिकारी मिलिंद महाजन, प्राध्यापक व इतर कर्मचारी वर्ग यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com