राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती कार्यक्रम गुरुवार, दि २६ जून २०२५ रोजी पार पडला. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांच्या शुभहस्ते छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी उपकुलसचिव गणेश कुमकुमवार, प्रभारी अधिक्षक शैलेश राठोड, कुलगुरू कार्यालयातील प्रभारी अधीक्षक सतीश साधनकर, जनसंपर्क अधिकारी प्रेमदास वाडकर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
