राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विदर्भ पाणी परिषद शनिवारपासून

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह धरमपेठ येथे ७, ८ व ९ जून २०२५ रोजी विदर्भ पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते विदर्भ पाणी परिषदेचे उद्घाटन शनिवार दि ७ जून रोजी सकाळी १०:०० वाजता होणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे (भाप्रसे), गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, एसएफएस प्रमुख राहुल गौड, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ राजू हिवसे, राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ समय बनसोड, जनकल्याण समितीचे अध्यक्ष सुमंतजी पुणतांबेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

पाण्यापासून सुरू होऊन पाण्यातच विलीन होणारा असा पाणी प्रवास अनोखे पैलू उलगडणारा ठरतो. विदर्भ पाणी परिषद नेमके याच अगत्याच्या विषयाला यंदा हात घालत आहे. विद्यार्थी, संशोधक, औद्योगिक जगत, कृषी क्षेत्र, शासन, प्रशासन, सामाजिक संस्था, संशोधन व शैक्षणिक क्षेत्रातील चिकित्सक मंडळी पहिल्यांदाच होऊ घातलेल्या विदर्भ पाणी परिषदेत वैचारिक मंथन करणार आहे.

विदर्भ पाणी परिषद अंतर्गत शनिवार दि ७ जून रोजी पेयजल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील ‘पेयजल समस्या आव्हाने व उपाय’ या विषयावर दुपारी २ ते ३:३० दरम्यान परिसंवाद होणार आहे. परिसंवादच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ एस व्यंकटमोहन राहणार आहे. वक्ते म्हणून व्हिआयएल नागपूरचे संचालक अरुण लखानी हे ‘शहरी भागातील पेयजल उपलब्धता, समस्या व उपाय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाचे उपसंचालक चंद्रकांत भोयर हे ‘ग्रामीण भागातील पेयजल सद्यस्थिती, समस्या व उपाय’ या विषयावर तर जलतज्ञ मुकुंद पात्रीकर हे ‘पिण्याचे पाणी, तंत्रज्ञान आणि सामाजिक उद्योजकता’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ४:०० वाजता संशोधक विद्यार्थी व जलअभ्यासक यांच्याद्वारे संशोधन पेपरचे सादरीकरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरु डॉ सुभाष कोंडावार राहणार असून स्पर्धा प्रमुख म्हणून डॉ योगेश मुरकुटे, परीक्षक म्हणून डॉ किर्तीकुमार रणदिवे, डॉ विजय करभाजणे हे जबाबदारी पार पाडणार आहे.

रविवार, दि ८ जून रोजी ‘कृषी जलपरिषद’ होणार असून ‘विदर्भातील कृषी योग्य पाणी सद्यस्थिती समस्या व उपाययोजना’ या विषयावरील सकाळी १०:०० वा आयोजित पहिल्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ शरद गडाख राहणार आहे. ‘पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील पाणी : समस्या व उपाय’ या विषयावर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे, ‘मध्य विदर्भातील शेतीसाठी पाण्याचे व्यवस्थापन: समस्या व उपाय’ या विषयावर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ महेंद्र देशमुख तर ‘पूर्व विदर्भातील पाण्याचे व्यवस्थापन : समस्या व उपाय’ या विषयावर प्रगतिशील शेतकरी आनंदराव राऊत मार्गदर्शन करणार आहे.

दुपारी १२:०० ते १:३० दरम्यान ‘विदर्भातील कृषी योग्य पाण्याचा वापर व त्यातील पाणी वापर संस्थांची भूमिका’ या विषयावरील दुसऱ्या परिसंवादाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री, रस्ते व वाहतूक, भारत सरकार नवी दिल्ली नितीनजी गडकरी यांची उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थान गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे भूषविणार असून ‘विदर्भातील ठिंबक सिंचनासाठी अभिनव तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर शरद पाणी वापर ठिबक सिंचन संस्था वरुड जिल्हा अमरावतीचे अध्यक्ष डॉ विजय शरद देशमुख, ‘पूर्व विदर्भातील जलसिंचन व पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण’ या विषयावर गोसेखुर्द पाणी वापर प्रकल्प, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या समन्वयक तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य शुभांगी नक्षिणे उंबरकर मार्गदर्शन करणार आहे. दुपारी २:३० ते ३:३० दरम्यान विदर्भातील जलव्यवस्थापनाच्या यशोगाथांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विजय चौथाईवाले भूषविणार आहे.

यावेळी सौर ऊर्जा आधारित उपसा सिंचन योजना मुरादपूरचे रुपेश सयाम, पूर्ती जलसिंचन संस्था तमासवाडा प्रकल्पाचे मिलिंद भगत, वाशिम जिल्ह्यातील पाणी व्यवस्थापनाचे सचिन कुलकर्णी यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. दुपारी ४ वाजता ‘विदर्भातील पाणी समस्या व उपाय’ यावर विद्यार्थ्यांद्वारे निर्मित रील्स स्क्रीनिंग व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थान नांदेड येथील जलव्यवस्थापन तज्ञ हनुमंत केंद्रे भूषविणार आहे. हनुमंत केंद्रे यांची प्रकट मुलाखत वेद घुळघुळे घेणार आहे. स्पर्धा प्रमुख म्हणून चित्रकला महाविद्यालय नागपूर येथील जय गाला कार्य पाहणार आहे आहे.

सोमवार दि ९ जून रोजी औद्योगिक जलपरिषद आयोजित असून सकाळी १०.३० ते १२.०० दरम्यान ‘औद्योगिक क्षेत्रातील पाण्याच्या समस्या व उपाययोजना’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अतुल वैद्य राहणार आहे. ‘उद्योगांसाठी पाण्याचा परिणामकारक वापर’ या विषयावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूरचे मुख्य अभियंता हेमा देशपांडे, ‘औद्योगिक क्षेत्रातील पाण्याचे शुद्धीकरण व पाण्याचा व्यावसायिक वापर’ या विषयावर क्लीनेज रिसोर्सेस इंडिया प्रा लि नागपुरचे अध्यक्ष डॉ रमेश दर्यापूरकर तर ‘औद्योगिक जलव्यवस्थापन व त्यातून रोजगार निर्मिती’ या विषयावर संभाजीनगर येथील निलेश कांदळगांवकर मार्गदर्शन करणार आहे.

दुपारी १२ ते १.३० दरम्यान याच विषयावरील दुसऱ्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ नितीन पाटील राहणार आहे. ‘विदर्भातील सिंचन सद्यस्थिती व अनुशेष’ या विषयावर डॉ कपिल चांद्रायन तर ‘जलकार्यक्षम विदर्भासाठी : रोडमॅप २०४७’ या विषयावर आकाश झा मार्गदर्शन करणार आहे. २.३० ते ३.३० दरम्यान विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच समारोपीय कार्यक्रम होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री चेतराम पवार, यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे (भाप्रसे), जनकल्याण समितीचे अध्यक्ष सुमनजी पुणतांबेकर, मुख्य अभियंता राजेश भोयर, रासेयो संचालक डॉ सोपानदेव पिसे, अधिसभा सदस्य शुभांगी नक्षिणे उंबरकर यांची उपस्थिती राहणार आहे.

विदर्भ पाणी परिषदेच्या मार्गदर्शक समितीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे (भाप्रसे), गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ शरद गडाख, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ नितीन पाटील, लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अतुल वैद्य, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था सीएसआयआर नागपूरचे संचालक डॉ एस व्यंकटमोहन, नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक डॉ उमेश घाटगे, राष्ट्रीय मृदा विज्ञान ब्युरोचे संचालक डॉ नितीन पाटील, भूसवियचे उपसंचालक डॉ चंद्रकांत भोयर यांचा समावेश आहे.

आयोजन समितीमध्ये विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजू हिवसे, राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ समय बनसोड, अधिसभा सदस्य डॉ विजय ईलोरकर, अधिसभा सदस्य शुभांगी नक्षिणे उंबरकर, अधिसभा सदस्य राज मदनकर, जनकल्याणकारी समिती नागपूरचे अध्यक्ष सुमंत पुणतांबेकर, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सोपानदव पिसे यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com