दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठात जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा
विद्यार्थी आणि शिक्षकांनी काढली कॅम्पस रॅली
वर्धा : सावंगी येथील शैक्षणिक परिसरात जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून ‘एक सायकल, हजार फायदे – पर्यावरणासाठी, आरोग्यासाठी व समाजासाठी’ असा संदेश देत दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाद्वारे कॅम्पस सायकल रॅली काढण्यात आली.
निरोगी जीवनशैली व पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाची सुरुवात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर व दत्ता मेघे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पेठे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. यावेळी, पूरक अभ्यासक्रम विभागाचे उपसंचालक डाॅ अजय पेठे, रुग्णालयाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अभिनंदन दास्तेनवार, सायकलपटू संजय दुरतकर, सुहास तिवसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.





विद्यापीठ परिसरातून निघालेली ही रॅली अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, भौतिकोपचार महाविद्यालय, महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, सालोड (हिरापूर) अशी परिक्रमा करीत दत्ता मेघे सभागृहाजवळ विसर्जित झाली. या रॅलीत सहभागी सायकलपटू व सहकाऱ्यांना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना आणि फिट इंडिया मुव्हमेन्टचे सहकार्य लाभले.
या रॅलीत व उपक्रमात डॉ अजय पेठे, डॉ निहाल मुंजेवार, अभिनंदन दास्तेनवार, संजय दुरतकर, सुहास तिवसकर, डॉ दुष्यन्त बाविस्कर, प्रियांश साहू, परिमल वाघमारे, निपुण धामगये, गौरव बावणे, अंकित शिरोडे, ऋषभ पाटील, प्रथम बोन्द्रे, ओम वर्मा, स्नेहा हौलदार, दुर्गेश शिंदोडे, तौशिब पठाण, क्रीडा अधिकारी अफसर पठाण, रमाकांत गोडे, आस्था ढोरे, मनीष पिसे, हर्षल महाजन, सुमित गेडाम, भारती राखुंडे, वैष्णवी साबळे, प्रेरणा रासेकर, सविता पोहेकर, सुजल सोनकर, दुर्गेश शिंदे, नितेश यादव, विश्वास चौधरी, मनस्वी नागले, सलोनी जांभुळकर, ऋषिकेश जंगले, आदर्श बाहेकर, प्रियांका मेश्राम, शिवानी नन्नवरे, तेजस वाटरे, वैभव दायरे, विल्सन दास, दीपक जवंजाळ, मनीष ठाकरे, वैष्णवी इंगळे, रेमा कन्नुरी, शिवम दांडेकर, प्रणोती भोयर, कल्याणी गावंडे, हसन मून, रुचिता वरटकर, ऑस्टिन फिरी, मुस्कान नथानी, मंजय राय, सी दीक्षित, प्रथमेश, रोशना राठी, डॉ पल्लवी आदित्य पुंडकर, श्रीलेख मनखैर, डॉ सायली दाते, महेश भोंग, डॉ मोहम्मद बशीरुद्दीन, शिवानी बकाल, पवनकुमार, धीरज तांबुलकर, शिफा जिवानी, अलिक जरिया, डॉ सुमंत ढोबळे आदींचा सहभाग होता.