यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ‘रीशेपिंग अवर फ्युचर विथ ए आय अँड ब्लॉकचेन’ विषयी व्याख्यान संपन्न

अमेरिकेतील सीईओ प्रमोद अत्तरदे यांचे मुक्त विद्यापीठात

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मूळ महाराष्ट्रीयन परंतु सध्या अमेरिका येथे डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील अपेक्स डेफी लॅब कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असलेल्या प्रमोद अत्तरदे यांचे ‘रीशेपिंग अवर फ्युचर विथ ए आय अँड ब्लॉकचेन’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विद्याशाखा आणि व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखेतर्फे संयुक्तरित्या आयोजित या व्याख्यानपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे होते. विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा जोगेन्द्रसिंह बिसेन, नाशिकमधील प्रसिद्ध डॉ ज्ञानदेव चोपडे आणि व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विद्यास्शाखा संचालक डॉ जयदीप निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना प्रमोद अत्तरदे म्हणाले की माहिती व तंत्रज्ञानाचा डाटा हा नव्या जगात खनिज तेलाच्या समकक्ष येवून ठेपला अआहे. आपल्यासह संपूर्ण जग हे एक मोठ्या परिवर्तनाच्या अवस्थेतून जात आहोत. हे परिवर्तन माहिती – तंत्रज्ञान व डिजिटल संबंधित आहे आणि त्याचा वेग या आधीच्या तर कुठल्याही बदलापेक्षा प्रचंड मोठा आहे. भारतासारख्या विकसनशील देशाने आताच हा बदल ओळखला नाही, त्याची साथ व तो वेग आत्मसात केला नाही तर आपण देश म्हणून आपण खूप मागे पडू शकतो. त्यातून कधीही भरून न येणारे नुकसान होवू शकते. त्यामुळे आपण सर्वांनी या बदलाला स्वीकारणे, त्याचे तंत्र आत्मसात करणे, मोठ्या संख्येने तरुण पिढीला त्याविषयी शिक्षित व प्रशिक्षित करणे आणि भावी पिढीसाठी एक चांगले व्यासपीठ तयार करणे खूप गरजेचे आहे असे आग्रही प्रतिपादन अत्तरदे यांनी आपल्या व्याख्यानात केले.

Advertisement

यावेळी त्यांनी ब्लॉकचेन प्रणालीविषयी देखील पीपीटी सादरीकरनातून मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे म्हणाले की चाक, वाफेचे इंजिन, संगणक व इंटरनेट अशा चार प्रमुख शोधांच्या क्रांतीनंतर आता एआय च्या रुपात नवीन पाचवी क्रांति होत आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी आपण सर्व युवा पिढीस एआय साक्षर व प्रशिक्षित करणे क्रमप्राप्त आहे. तसेच आपले शिक्षण पूर्ण झालेले आहे असे ज्यांना वाटते त्यांनी देखील स्वत:ला पुनर्प्रशिक्षित करून स्वत:चे कौशल्य वाढविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

प्रमुख अतिथी यांचा परिचय शैक्षणिक संयोजक सुजाता मोरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शैक्षणिक संयोजक मनोहर पवार यांनी केले. यावेळी विद्यापीठातील सर्व विद्याशाखा संचालक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *