श्री संत गुलाबराव महाराजांच्या साहित्यावर संशोधन करणाऱ्या संशोधकास विद्यापीठातर्फे आर्थिक सहाय्य
संशोधकांनी लाभ घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे दानदाते वासुदेवराव राजारामजी देशमुख यांचेकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून श्री संत गुलाबराव महाराजांचे जीवन, साहित्य, विचार, तत्वज्ञान, शिक्षण व कवितेवर विद्यापीठात आचार्य पदवीकरिता संशोधन करणाऱ्या एका संशोधकास प्रति वर्ष रू 6000/- याप्रमाणे दोन वर्ष एकूण रू 12,000/- संशोधन आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते.

शैक्षणिक वर्ष 2025-26 व 2026-27 करिता सदर आर्थिक सहाय्य एका संशोधकास प्रदान करावयाचे आहे. विद्यापीठात संशोधन करणाया संशोधकांनी विहित नमुन्यात आवेदनपत्रे दि 30 जून, 2025 पर्यंत सादर करावयाची आहे. आवेदनपत्राचा विहित नमुना व इतर तपशील विद्यापीठाच्या वित्त विभागात नि:शुल्क उपलब्ध असून सदर आर्थिक सहाय्याचा संशोधकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे यांनी केले आहे.
अधिक माहितीकरिता त्यांचेशी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र 9881465567 यावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.