एबीसी / अपार आयडी नसलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे निकाल थांबणार – मुक्त विद्यापीठाचा इशारा

नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना एबीसी (Academic Bank of Credit) वा अपार आयडी (APAAR ID) नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे की, ज्यांनी ही नोंदणी केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांचे मे २०२५ च्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार नाहीत.

विद्यापीठ संकेतस्थळावर (https://ycmou.digitaluniversity.ac/) अशा विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, अभ्यास केंद्रांनी संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून नोंदणी प्रक्रिया (https://www.abc.gov.in/) तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

विद्यार्थ्यांनी एबीसी/अपार आयडी तयार केल्यानंतर 30 एप्रिल 2025 पर्यंत आपले नाव, कायम नोंदणी क्रमांक (PRN), शिक्षणक्रम कोड आणि एबीसी आयडीसह nadsupport@ycmou.ac.in या ईमेलवर माहिती पाठवावी, असे आवाहन परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *