कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा त्रयोदश दीक्षांत समारंभाचे १६ एप्रिल रोजी आयोजन

रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा त्रयोदश दीक्षांत समारंभ बुधवार, दि 16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आणि विश्वविद्यालयाचे कुलपती सी पी राधाकृष्णन् हे दीक्षांत समारोहाचे अध्यक्षस्थान भूषवतील. कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणा-या या समारोहाचे प्रमुख अतिथी या नात्याने प्रसिद्ध संस्कृत विद्वान् संस्कृत भारतीचे संस्थापक पद्मश्री चमू कृष्ण शास्त्री, अध्यक्ष, भारतीय भाषा समिती, उच्च शिक्षा विभाग, केंद्र सरकार व विशिष्ट अतिथी म्हणून चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य तसेच डॉ प्रशांत नारनवरे, (IAS) मा राज्यपाल यांचे सचिव एस राममूर्ती, (IAS) मा राज्यपाल यांचे उपसचिव, सारस्वत अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ देवानंद शुक्ल, परीक्षा नियंत्रक डॉ केशव मोहरीर, व्यवस्थापन परिषद, विद्वत् परिषदेचे सदस्य, सर्व संकायांचे अधिष्ठाता आणि पदकदान दाते याप्रसंगी विशेषत्वाने उपस्थित राहतील. या दीक्षांत समारोहात 2023-24 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी या दीक्षांत समारोहात 2756 पदव्युत्तर पदवी, 4228 पदवी, 1367 पदविका, 109 पदव्युत्तर पदविका, व 97 प्रमाणपत्रासह मुक्त स्वाध्यायपीठम् द्वारा 278 पदव्युत्तर पदवी, पदविका व प्रमाणपत्र अशी एकूण 8854 पदवी प्रमाणपत्रे प्रदान करतील. एकूण 50 सुवर्ण पदकांसह 14 रोख पारितोषिके देखील या दीक्षांत समारोहात प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच याप्रसंगी 19 विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखा अंतर्गत विद्यावारिधी (पीएच्डी) पदवीने गौरवान्वित करण्यात येईल.

त्रयोदश दीक्षांत वैशिष्टये

Advertisement

सर्वाधिक पदके 9 सुवर्ण पदके व 1 रोख पारितोषिक सिमरन ठाकूरला एम ए आचार्य (संस्कृत) विषयात सर्वाधिक गुण पाप्त केल्याबद्दल तसेच आणि सर्व विद्याशाखांमधून सर्वप्रथम आल्याबद्दल सिमरन रवींद्र ठाकूर (2023-24) या विद्यार्थिनीला सर्वाधिक पदके 9 सुवर्ण पद‌के व रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्यपाल यांच्याद्वारे प्रदान करण्यात येणारे कुलपती सुवर्णपद‌क राज्यपाल आणि विश्वविद्यालयाचे कुलपती यांच्याद्वारे देण्यात येणारे कुलपती सुवर्णपदक आचार्य (एम ए (संस्कृत) मध्ये सर्वाधिक गुण अर्थात् प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या सिमरन रींद्र ठाकूर (23-241 हिला प्रदान करण्यात येणार आहे.

सर्वोत्तम अष्टपैलू विद्यार्थी सुवर्णपदक विश्वविद्यालयाच्या रामटेक, चारंगा व रत्नागिरी या परिसरातून सर्वस्तरीय सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांला देण्यात येणारे श्री समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ स्मृती सुवर्णपदक 2023-24 करिता कृतिका रितेश जैन हिला प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय सम्मानित शाक्षी परीक्षेत सर्व संकाऱ्यांमधून सर्वाधिक गुण पाठ केल्यावद्दलही कृतिका जैन हिला सुवर्णपदक प्रदान करण्यात येईल. सर्वोत्तम प्रबंधाचे पारितोषिक प्रत्येक संकाचातील सर्वोत्कृष्ट प्रबंधाला देण्यात येणार आहे.

संस्कृत, योग, योगविज्ञान, वास्तु, वेद ग्रंथालयशाख, ज्योतिष, कीर्तन, प्रशासकीय सेवा, आतिथ्यसेवा Hospitality Studies, शिक्षण, संगणक उपयोजन, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला, ललितकला इ. 35 हुन अधिक विविध विषयांमध्ये सर्वाविक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी पदवी आणि पदके प्रदान करण्यात येतील.

पत्रकार परिषदेला विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांनी संबोधित केले. कुलसचिव डॉ देवानंद शुक्ल, अधिष्ठाता ललिता चंद्रात्रे, प्रो कृष्णकुमार पांडेय, प्रो पराग जोशी, विद्यापीठ नियोजन मंडळ संचालक प्रो प्रसाद गोखले, छात्र कल्याण संचालक डॉ जवयंत चौधरी, परीक्षा विभागातील सहायक कुलसचिवद्वय श्रीपाद अभ्यंकर, सुमित कठाळे व जनसंपर्क अधिकारी डॉ रेणुका बोकारे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *