गोंडवाना विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपचा शुभारंभ
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी टाटा टेक्नालॉजी सी आय आय आय टी (सेंटर फॉर इकोव्हेशन, इनक्युबेशन, इनव्हेंशन, ट्रेनिंग सेंटर) येथे इंटर्नशिप सुरू झाली आहे. या इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरमध्ये आवश्यक कौशल्ये आणि अनुभव मिळणार आहेत.
इंटर्नशिपच्या ह्या शुभारंभ कार्यक्रमात टाटा टेक्नालॉजी सी आय आय आय टी चे समन्वयक डॉ कृष्णा कारू, ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंटचे समन्वयक अनिरुद्ध गचके, भौतिकशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ सुनील बागडे, भौतिकशास्त्र विभागाच्या प्रशिक्षण समन्वयक प्राध्यापिका डॉ अपर्णा भाके, प्रशिक्षण सहाय्यक बॉबी खोब्रागडे, बोरलीवार, आदित्य कोल्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भौतिकशास्त्र विभागाच्या ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट समन्वयक प्रा डॉ अपर्णा भाके यांच्या प्रास्ताविकाने झाली. डॉ कृष्णा कारू, अनिरुद्ध गचके आणि डॉ सुनील बागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुभवाचे आणि पात्रतेचे महत्त्व सांगितले.या इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगात काम करण्याचा अनुभव मिळेल, तसेच त्यांच्यातील कौशल्ये विकसित होतील. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढविला आहे. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.